महाविद्यालयामधील नियमित वर्ग दिनांक 20 ऑक्टोबर, 2021 पासून सुरु करण्यास मान्यता दिली आहे. यास अनुसरुन विद्यालये आणि महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र कॉलेजेस सुरु करण्या संदर्भात राज्य सरकार कडून काही नियमावली (Rules to attend College in Maharashtra) तयार करण्यात आली आहे.
50 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने वर्ग सुरु करण्याविषयी स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय निर्णय घ्यावा, त्यानुसार महाविद्यालयांना सविस्तर मार्गदर्शक सूचना / मानक कार्यप्रणाली (एसओपी) द्यावी, वसतीगृहे टप्याटण्याने सुरु करावेत, ज्या विद्यार्थ्यांनी कोविड-19 ची लस घेतलेली नाही, त्यांच्याकरिता स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी.तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे देखील लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे.