न्यायाधीशाला भर कोर्टात सरकारी वकिलाने कानशिलात लावली, हे आहे कारण

न्यायालयात अघटीत प्रकार घडला आहे. यामध्ये एका सरकारी वकिलाने न्यायाधीशाच्या कानशिलात लावली आहे. हा सर्व प्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात घडला आहे. 
 
खटल्यासंदर्भात दाखल केलेली याचिका फेटाळल्याने चिडलेल्या सरकारी वकिलाने थेट निकाल देणाऱ्या न्यायाधीशांच्याच जोरदार कानशिलात लावली आहे. हल्ल्यामुळे संबंधीत न्यायाधिशांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून लगेच हल्लेखोर वकिलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्या. के. आर. देशपांडे असे मारहाण झालेल्या न्यायाधिशांचे नाव आहे. सिविल कोर्टात देशपांडे न्यायाधीश आहेत. तर त्यांना मारणारा अॅड. समीर पराटे असे हल्लेखोर सरकारी वकिलाचे नाव असून, अॅड. पराटे यांच्या वडिलांवरील एका खटल्यासंदर्भातील याचिका न्या. देशपांडे यांनी फेटाळून लावली होती. त्यानंतर चिडलेल्या पराटे यांनी न्या. देशपांडे यांच्या जोरदार कानशिलात लगावली आहे. 
 
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे न्या. देशपांडे यांच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली  असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर सेशन जज वसंत कुलकर्णी यांच्या चेंबरमध्ये तातडीने न्यायाधीशांची महत्वाची बैठक घेण्यात आली. त्यामुळे आता न्यायाधीस काय निर्णय घेतात हे पहावे लागणार असून, विशेष म्हणजे गृह खाते हे मुख्यमंत्री यांच्या कडे आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती