नागपुरातील एका आयटी कंपनीत कर्मचाऱ्याचा कंपनीच्या स्वछतागृहात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. 40 वर्षीय हा कर्मचारी शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास कंपनीच्या टॉयलेट मध्ये बेशुद्धावस्थेत आढळला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नितीन एडविन मायकल असे या मयत चे नाव आहे.