रवींद्र वायकर यांच्या48 मतांनी विजयाला अमोल कीर्तिकर यांचे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

बुधवार, 17 जुलै 2024 (09:50 IST)
लोकसभा निवडणुकीत रवींद्र वायकर 48 मताने विजयी झाले. त्यांच्या विजयला युबीटीचे अमोल कीर्तिकरांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांना विजयी घोषित करण्याची मागणी याचिकेत केली आहे. 
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील रवींद्र वायकरांनी युबीटीचे अमोल कीर्तिकरांचा 48 मतांनी प्रभाव केला.
 
कीर्तिकरांचे वकील अमित कारंडे यांच्या मार्फत दाखल केलेल्या याचिकेत मतमोजणी केंद्रातील समस्या आणि विहित निकषांचे पालन न करण्याचा आरोप करण्यात आला. कीर्तिकरांचे मतमोजणी टेबलावर कीर्तिकर यांच्या प्रतिनिधींनी नोंद केलेल्या मतांच्या तुलनेत तफावत असल्याचे म्हणाले. 
मतांच्या फेरमोजणीची मागणी करण्यात आली.वैधानिक सूचनांकडे दुर्लक्ष करून घाईघाईने फेटाळण्यात आल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला .

मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याची आणि मतमोजणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेवर सुनावणी करताना कीर्तिकर यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मागवण्याची मागणीही न्यायालयाकडे केली.  
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती