अलमट्टी धरण 100 टक्के भरल्याने धरणातून विसर्ग वाढवण्यात येणार आहे. सकाळपासून आलमट्टी धरणातून 50 हजार क्यूसेकचा विसर्ग वाढवला होता. दरम्यान दुपारी अडीच वाजल्यापासून 1 लाख 75 क्यूसेकचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती कर्नाटक प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे नदीकाठच्य़ा गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.