शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडी च्या कोठडीत आहे. त्यांना आज कोर्टात कोठडीची मुदत संपल्यामुळे हजर करण्यात आले त्यांना 8 ऑगस्ट पर्यंतची कोठडी सुनावण्यात आली होती मात्र आता न्यायालयाने राऊतांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असल्यामुळे त्यांना अजून 14 दिवस कोठडीत राहावे लागणार आहे.
पत्राचाळ मुंबईतील गोरेगाव येथे आहे या चाळीत राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सरकारने सदनिका देण्याची योजना आखल्यापासून हा घोटाळा सुरु झाला. या साठी महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने HDIL च्या गुरुआशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला या साठी कॉन्ट्रॅक्ट दिले ही कंपनी या भाडेकरूंसाठी तब्बल 3 हजार फ्लॅट हे 672 सदनिका घेऊन MHDL ला देणार होती. या कंपनीचे संचालक राकेश वाढवणं असून संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्याशी असून प्रवीण राऊतांनी या कंपनीच्या संचालकासोबत मिळून पत्राचाळीच्या प्रकल्पात घोटाळा केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक केली आहे.