राज्यातील काही भागात मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडेल. राज्यात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. राज्यातील विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच येत्या 24 तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून अकोला, गोंदिया, अमरावती, नागपुरात विजांच्या गडगडाटासह येत्या दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचं खूप नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी खूप चिंतेत आहे. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका यवतमाळ जिल्ह्याला बसला आहे. तसेच नाशिक व बुलडाणा जिल्ह्यात पिकांचं खूप नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात कांदा व द्राक्षांच्या पिकाचे नुकसान झालं आहे. तर नंदुरबार जिल्ह्यात भात, कापूस, मिरची, मका,तूर, कांदाच्यापिकाचे भलेमोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानामुळे शेतकरी चिंतेत आहे.