अजित पवार म्हणाले, त्यांनी काय म्हटलं हे त्यांनाच विचारत जा

मंगळवार, 4 जानेवारी 2022 (15:05 IST)
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर केलेल्या वक्तव्याबाबत विचारणा केली असता उपमुख्यमंत्री अजित पवार संतापलेले दिसले. महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तर द्यायला मी मोकळा नाही, असं म्हणत अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी काय म्हटलं हे त्यांनाच विचारत जा, असंही नमूद केलं.
 
अजित पवार म्हणाले, “जितेंद्र आव्हाड यांच्या ओबीसी आरक्षणाच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रात कोण काय म्हटलं याची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मी माझी मतं स्पष्टपणे सांगण्यासाठी केव्हाही तयार असतो. त्याचा अनुभव सर्व पत्रकार घेत असता. त्यांनी काय म्हटल हे तुम्ही त्यांनाच विचारत चला.”
 
“मी क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने माझी भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. आमची हीच इच्छा आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीबद्दलचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय निवडणुका घेण्यातच येऊ नये. त्याही घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. तशा पद्धतीने आम्ही ठरावही केला. ज्या सर्व गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या केलेल्या आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती