पालकमंत्री झालेले झिरवाळ यांनी वसमतचे आमदार राजू नवघरे यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात सांगितले की, मी पहिल्यांदाच मंत्री व पालकमंत्री झालो आहे. इथे आल्यावर माझ्या सारख्या गरीबाला हिंगोली सारख्या गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री करण्यात आल्याची जाणीव झाली. त्यामुळे आता मी मुंबईला गेल्यावर माझ्या वरिष्ठांना विचारेन की तुम्ही गरीब जिल्हा एका गरीबाला का दिला?त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यांनी दिलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी फटकारले असून त्यांना जाहीरपणे अशी वक्तव्ये टाळण्याचा सल्ला दिला आहे.
शिवसेनेचे (यूबीटी) खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवाल यांच्या वक्तव्याचा समाचार घेत झिरवाल यांना गरीब म्हणणे हा गौतम अदानी यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे. शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला होता, हे बिचाऱ्याला आठवत नाही. असे म्हणत संजय राउत यांनी टोला लगावला आहे.