अजित पवारांनी शरद पवारांना फोन करुन तब्बेतीची विचारपूस केली

सोमवार, 27 जानेवारी 2025 (20:19 IST)
अजित पवार आणि शरद पवारांच्या एकत्र होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. या चर्चे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. तेव्हा पासून अनेक प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या.

शरद पवार गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहे. ते गेल्या आठवड्यात सांगली आणि कोल्हापूरला गेले होते. कोल्हापूरात एका कार्यक्रमात भाषण करताना ते आजारी पडले. त्यांचे पुढील दौरे रद्द करण्यात आले आहे. त्यांचा 4 दिवसांचा दौरा रद्द करण्यात आला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ पवार यांना सर्दीसोबतच घशात खोकल्याचीही तक्रार आहे. त्यामुळे त्यांना बोलण्यात आणि भाषण करण्यात अडचण येत आहे.
ALSO READ: बाबूराव चांदेरे यांच्यावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल,अजित पवारांनी दिले हे आदेश
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांना सर्दी, खोकलाचा त्रास होत आहे. त्यांना डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.ते विश्रांती घेत असल्याची पुष्टि त्यांच्या कार्यालयाने केली असून या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती