मुंबई : अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधण्यात येत आहे. परंतु, आता तर अजित पवारांवर थेट माजी महिला आयपीएस अधिकारी यांनी गंभीर आरोप केला आहे. माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर पुस्तकामधून अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे आता एका नवीन वादाला सुरुवात झाली आहे. माजी आयपीएस अधिकारी असलेल्या मीरा बोरवणकर यांचे मॅडम कमिशनर हे पुस्तक प्रकाशित झाले असून हे सर्वत्र उपलब्ध होणार आहे. याच पुस्तकांत त्यांनी अजित पवार यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.परंतु, मीरा बोरवणकरांच्या या आरोपांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावले आहे.