जुनी पेन्शन योजनेचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिंडळ पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत लावून धरला. जे निर्णय सरकार घेते ते निर्णय समाजाच्या भल्यासाठी नसतील तर आपण लोकप्रतिनिधी आहोत लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे. नवीन कायदा करायचा असेल तर आणि त्यात कोर्टाचा अवमान होऊ नये असे असेल तर आम्ही सहकार्य करायला तयार आहोत असेही अजितदादा म्हणाले.
शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. शिक्षक नवीन पिढी घडवण्याचे काम करतात म्हणून त्यांना पेन्शन मिळायला हवी अशी मागणी केली. सरकारने सुरुवातीपासूनच त्यांना पूर्ण पगारावर घेतले असते कुठलेही सरकार असले तरीही पेन्शन द्यावीच लागली असती असेही अजितदादा म्हणाले. अधिवेशन संपत आहे. विधी न्याय खात्याशी चर्चा करुन करा परंतु अभ्यासगट काही करु शकणार नाहीत. पळवाट काढण्याऐवजी तुम्ही सभागृहात शिक्षकांना पेन्शन योजना लागू करू असा शब्द द्या अशी मागणीही पवार यांनी केली.