आणि एकनाथ खडसे भावूक झाले

बुधवार, 3 जुलै 2019 (09:41 IST)
फडणवीस सरकारच्या अधिवेशनातील शेवटच्या दिवशी बोलताना एकनाथ खडसे यांनी मनातील खदखद बोलून दाखवली. विरोधी पक्षनेतेपदी असताना मी नेहमीच पुराव्यनिशी सभागृहात मुद्दे मांडले. आरोप-प्रत्यारोप हे सभागृहात होतच असतात, पण मी पुराव्यासह सभागृहात आरोप केले. बिनबुडाच्या आरोपाने काय वेदना होतात, हे मला चांगलच माहित आहे. विधानसभेतील 288 आमदारांपैकी सर्वात भ्रष्ट अन् नालायक आमदार म्हणून मी आज उभा आहे, अशी खंत खडसेंनी बोलून दाखवली. 
 
दाऊदच्या बायकोशी माझ्या फोनवरुन संभाषण झाल्याचे आरोप माझ्यावर करण्यात आले. पण, दाऊदला सोडून तिला नाथाभाऊशी का बोलावं वाटेल? असा मजेशीर प्रश्नही खडसेंनी सभागृहात विचारला. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती