आज देवी अहिल्याबाई जयंती साजरी केली जात आहे.राज्यातील अहमदनगर जिल्ह्यात चौंडी येथे देवी अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. या वेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही अहिल्याबाई यांचे आदर्श डोळ्यापुढे ठेऊन काम करतो. आता लवकरच अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. नाव बदलण्याच्या निर्णय घेणं आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.