चारित्र्य संशयावरून दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीसह दोन मुलींच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळण्याची धक्कादायक घटना अहमदनगर तालूक्यातील वडगाव लांडगा येथे घडली आहे.सुनील लांडगे असे या आरोपी पतीचे नाव आहे. पिंपळगाव येथे सुनील लांडगे या तरुणाने दारूच्या नशेत आल्यावर सोमवारी सकाळी आपली पत्नी व दोन मुलींना चारित्र्य संशयावरून जिवंत जाळले. आरोपी पत्नी व मुलींना पेटवून अंगणात झाडाखाली निवांत बसला होता.
पोलिसानी घटनास्थळी तातडीनं पोहोचून तिघांचे मृतदेह खोलीतून बाहेर काढले. पत्नी आणि मुलींना ज्या पत्राच्या खोलीत जाळले ती खोली देखील जळून खाक झाली आहे. एवढेच नाही तर आरोपीने पत्नीला शेजाऱ्यांनी वाचवू नयेया साठी खोलीला टाळे लावले.त्याने त्या तिघी जाळतांनाच व्हिडीओ देखील बनवला. घरातून धूर निघताना पाहून शेजारच्यांनी घराकडे धाव घेतल्यावर त्यांना खोलीला टाळा लावलेला दिसला या आगीत होरपळून सुनीलची पत्नी, व दोघी मुलींचा दुर्देवी मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून आरोपी पतीला अटक केली आहे.