सरकारी यंत्रणांचा वापर करुन अहिल्यादेवींची पुण्यतिथी हायजॅक- फडणवीस

मंगळवार, 31 मे 2022 (16:15 IST)
चौंडीला नेहमी कुठलाही पक्ष अभिनिवेश न ठेवता साजरी केली जाते. सर्वप्रकारचे लोक याठिकाणी येतात. पण यावेळी सरकारी तंत्राचा उपयोग करुन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंन्द्र फडणवीस यांनी केला आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधला. भाजप आमदार गोपीचंद पडळकर  आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत  यांना चोंडीला जाताना पोलिसांनी अडवले. या घटने नंतर फडणवीसांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
 
महाविकास आघाडीवर निशाणा साधताना ते म्हणाले, राम शिंदे हे अहिल्यादेवी होळकरांचे वंशज आहेत त्यांनाही त्रास देण्यात आला आहे. गोपिचंद पडळकर हे अहिल्यादेवींच्य़ा विचाराने चालतात त्यांनाही अडवले जात आहे. यांना का अडवले जात आहे असा सवाल त्यांनी केला. यासंदर्भात गांभीर्याने विचार झाला पाहिजे. आणि हायजॅक बंद झाले पाहिजे असेही ते म्हणाले.
 
राज्यसभा उमेदवारी संदर्भात बोलताना ते म्हणाले, भाजपातील सर्व आमदार सद्सद्बुध्दीचा वापर करुन मते देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले, सूर्याकडे बघून थुंकले की थुंकी आपल्याच तोंडावर पडते. त्यांनी सूर्याकडे बघून थुंकण्याचा प्रयत्न केला आहे. थुंक त्यांच्या तोंडावरच पडेल असा टोलाही लगावला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती