मराठी पाट्यांसाठी शेवटची मुदत आज, या पुढे कारवाई होणार

मंगळवार, 31 मे 2022 (15:13 IST)
राज्यातील दुकाने, आस्थापने, शासकीय-निम शासकीय कार्यालयांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत आज 31 मे रोजी संपणार आहे. अद्याप मराठी पाट्या लावल्या नसल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकार चे  मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या साठीचे प्रयत्न सुरु आहे.  महाराष्ट्रातील दुकाने आणि आस्थापनांवर मोठ्या आणि ठळक मराठी भाषेत फलक लावण्याची सक्ती करण्यात आली. राज्य सरकारने आवाहन केले. जनजागृतीसाठी स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यात आली.राज्यातील दुकाने, आस्थापने, शासकीय-निम शासकीय कार्यालयांवर ठळक अक्षरात मराठी पाट्या लावण्यासाठी दिलेली मुदत आज 31 मे रोजी संपणार आहे.नियमांचे पालन न केल्यास दोषींवर कारवाई करण्यात येईल असा इशारा भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी दिला होता. आता प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती