कॉलेजमध्ये नाग आणि नागिणीने घातली 25 अंडी, मालेगावातील प्रकार

मंगळवार, 31 मे 2022 (13:16 IST)
सापाच्या नावानेच अंगाला थरकाप होतो. त्यात तो नाग विषारी कोब्रा असेल आणि तो आपल्या समोरच असेल  तर अशा स्थितीत त्या व्यक्तीची अवस्था काय  होईल हे सांगणे कठीण आहे. मालेगावातील एका नर्सिंग कॉलेजच्या स्टोअर रूम  मध्ये नागाचं जोडपं आढळलं. नागाच्या या जोडप्याने त्या स्टोअररूम मध्ये घर केले असून सुमारे 25 अंडी घातली आहे. 
 
मालेगावाच्या शासकीय नर्सिंग कॉलेजात आज सकाळी एक विद्यार्थीनी गेली असता तिला समोर फणा काढून बसलेला कोब्रा दिसला. आपल्या समोर विषारी कोब्रा पाहून तिच्या अंगाचा थरकाप उडाला.ती तिथून पळ काढत सरळ शिक्षकांकडे गेली. आणि घडलेले सांगितले. विषारी कोब्रा कॉलेजच्या स्टोअररूम असल्याचे समजतातच कॉलेजात भीती पसरली. अखेर तातडीने सर्पमित्राला बोलावले आणि त्यांनी येऊन नागाचा शोध घेत सुमारे अर्ध्या तासाचा प्रयत्नानंतर नाग नागिणीच्या जोडप्याला पकडले शोध घेताना त्यांना नागाची 25 अंडी आढळून आली. सर्पमित्राने नाग-नागीण जोडप्यासह त्यांची अंडी वनविभागाच्या सुपूर्द  केली. वारंवार त्या कॉलेजात साप निघत असल्याचे सांगण्यात आले आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती