रुपाली चाकणकर यांना पुढील २४ तासात जीवे मारण्याची धमकी

मंगळवार, 31 मे 2022 (08:53 IST)
राष्ट्रवादी काँग्रेेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांमध्ये तिसऱ्यांदा त्यांना मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात फोन आला होता. तसेच पत्रही पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांना पुढील २४ तासात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
 
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर महाराष्ट्र दौरा करत असतात. महिलांवर होणारे अत्याचार आणि महिलांच्या प्रश्नांवरुन त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले आहेत. या निर्णयांमुळे अनेकांशी वैर निर्माण झाले असल्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात अज्ञात व्यक्तीने फोन करुन रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांमध्ये तिसऱ्यांदा त्यांना धमकी देण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. रुपाली चाकणकर यांना धमकी देणारा अज्ञात व्यक्ती अहमदनगरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जीवे मारण्याची धमकी देण्यामगील कारण अद्याप समजू शकले नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती