Dhananjay Munde: कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण

रविवार, 24 डिसेंबर 2023 (17:07 IST)
देशभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. कोरोनाचे प्रकरण पुन्हा वाढत आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे.राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहे.  आता राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण लागली आहे. 

धनंजय मुंडे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांनी कोविडची चाचणी केली. त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. त्यांना त्याच्या पुण्यातील निवास्थानी उपचार देणे सुरु आहे. 
मुंडे यांना यापूर्वी दोन वर्षांपूर्वी देखील कोरोनाची लगान लागली होती. आता पुन्हा त्यांना कोरोनाची लागण लागली आहे. ते पुण्यातील घरी क्वारंटाईन आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहे. 
 
 राज्य सरकार ने या संसर्गाला घाबरून न जाता कोविड अनुरूप सूचनांचे काटेकोर पालन करण्यास सांगितले आहे.तसे आवाहन आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.  
 
कोरोनाचे नवीन सब-व्हेरियंट JN.1 समोर येताच देशभरात चिंता वाढली आहे. त्याच वेळी, कोरोना (कोरोनाव्हायरस JN.1 भिन्न लक्षणे) प्रकरणे देखील वेगाने वाढत आहेत. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, अनेक राज्यांनी मास्क संबंधित सल्ला देणे सुरू केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने JN.1 प्रकाराचे वर्गीकरण केले आहे. यातून फारसा धोका नसल्याचेही सांगितले.
लक्षणे -
ताप
वाहती सर्दी
घसा खवखवणे
डोकेदुखी
काही प्रकरणांमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या
अति थकवा
थकवा आणि स्नायू कमकुवतपणा
हे काहीही लक्षणे दिसल्यास तातडीनं चाचणी करून घ्या . 
 
Edited By- Priya DIxit    

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती