निवडणूक निकालानंतर आता राहुल गांधींना कोणी पप्पू नाही म्हणणार -शरद पवार

शनिवार, 29 जून 2024 (17:38 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींचे कौतुक केले आहे. ते म्हणाले,  आता लोकसभाच्या निकालानंतर राहुल गांधींना कोणीही पप्पू म्हणणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार खुश असून आता ते विधानसभा निवडणुकीच्या तयारीत लागले आहे.

त्यांनी एका कार्यक्रमात राहुल गांधींचे कौतुक केले असून तरुणपिढीचे प्रतिनिधी म्हणून राहुल गांधी यांची निवड पक्षनेते म्हणून झाली ही चांगलीच गोष्ट आहे. त्यांचा पक्षाची संख्यात्मक ताकद जास्त आहे. लोकसभा निवडणुकीत जे काही झाले त्यानंतर आता कोणीही राहुल गांधी यांना पप्पू म्हणार नाही. 
 
यंदाच्या लोकसभाच्या निवडणुकीत महाराष्ट्र लोकसभेच्या एकूण 48 जागांपैकी शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरदपवार गट आणि काँग्रेस पक्षाने 30 जागा जिंकल्या तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाने 17 जागांवर जिंकले.
 
 Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती