नागपूर: महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला

शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (12:06 IST)
नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला डॉक्टरसह तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 
 
अॅसिड अटॅक झाल्यावर महिला डॉक्टर स्वत:चा बचाव करत असताना त्या ठिकाणी उपस्थित दोन जण देखील जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे.हा प्रकार घडताना त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी आरोपीला पकडून बेदम चोप दिला. 
 
महिला डॉक्टरवर ऍसिड हल्ला करण्यामागे त्याचा काय उद्देश होता, अद्याप याचेही माहिती समजू शकलेली नाही. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती