नागपुरात गाडीने चिरडून रुग्णालयात नेण्याचा बहाण्याने पुलावरून फेकले, गुन्हा दाखल
बुधवार, 2 एप्रिल 2025 (16:32 IST)
नागपुरातून मानवतेला लाजवणारी लज्जास्पद घटना समोर आली आहे. स्वतःच्या वाहनाने दुचाकीवरून कामावरून घरी जात असताना एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या मध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. वाहन चालकाने अपघातांनंतर जखमीच्या सभोवताली जमलेली गर्दी पाहून चालकाने जखमीला रुग्णालयात नेतो असे सांगून नागपूरच्या दिशेने रुग्णालयात घेऊन गेला आणि जखमीला पुलावरून खाली फेकून तिथून पसार झाला.
पुलावरून फेकल्यामुळे जखमी व्यक्ती बराच काळ जखमीअवस्थेत राहिला अखेर त्याचा मृत्यू झाला. कृष्णा बोरसे असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याचा शोध घेत आहे.
सदर प्रकरण नागपूर जिल्ह्यातील मिहान सेझला लागून असलेल्या एका कर्करोग संस्थेशी संबंधित आहे. कृष्णा बोरसे हे दुचाकीवरून कामावरून घरी जात असताना त्यांना वेगवान वाहनाने धडक दिली. या अपघातात ते जखमी झाले. त्यांच्या भोवती लोकांची गर्दी जमली हे पाहून आरोपी वाहन चालकाने त्यांना रुग्णालयात नेण्याच्या बहाण्याने गाडीत घालून नागपूरच्या रुग्णालयाच्या दिशेने गाडी नेली. मात्र त्यांना रुग्णालयात न नेता जखमी अवस्थेत एका पुलावरून खाली फेकून दिले. ते बऱ्याच वेळ त्या अवस्थेत पडून राहिले.
पोलिसांना अपघाताची माहिती मिळाल्यावर ते नागपूरच्या सरकारी रुग्णालयात जखमी कृष्णा यांची चौकशी करायला गेले असता कृष्णा नावाची अशी कोणतीही व्यक्ती रुग्णालयात दाखल नाही पोलिसांना संशय आला. दरम्यान पोलिसांना पुलावरून अज्ञात इसम खाली पडल्याची माहिती मिळाली. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले तो पर्यंत कृष्णा यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मृतदेह कृष्णा बोरसे यांचा असल्याची पुष्टी केल्यावर हिंगणा पोलीस ठाण्यात आरोपी चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु केला आहे.