सध्या वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची कापणी झाल्याने ते रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहे. अशातच वर्ध्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीची मशागत करताना तोल गेल्यामुळे चालक टॅक्टरवरून खाली पडला आणि टॅक्टरला लावलेल्या रोटाव्हेटरमध्ये आल्याने टॅक्टर चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
वर्धा जिल्ह्यातल्या समुद्रपूर तालुक्याच्या निरगुडी येथे ही घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्याच्या निरगुडी येथे शेताची रोटाव्हेटरने मशागत सुरु होती. त्याचवेळी टॅक्टर चालकाचा अचानक तोल गेला आणि तो खाली पडला. त्याचवेळी तो थेट रोटाव्हेटरमध्ये आल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये टॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. पुरषोत्तम देवराव धोटे असं मृत टॅक्टर चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे निरगुडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
निरगुडी येथील निलेश धोटे यांनी रब्बी हंगाम सुरू झाल्यामुळे शेतीच्या मशागतीसाठी रोटाव्हेटर यंत्र असलेले टॅक्टर बोलावले होते. शेतीची मशागत सुरु असताना अचानक टॅक्टरचालक पुरषोत्तम धोटे याचा टॅक्टरवरून तोल गेला आणि ते खाली पडले. यात पुरषोत्तमच्या अंगावरून टॅक्टरचे मोठे चाक गेले आणि त्याचे पाय रोटाव्हेटरमध्ये अडकले.