पुणे मुंबई मार्गावर लोणावळ्याजवळ अपघात; दोन जण ठार
सोमवार, 22 मे 2017 (11:35 IST)
पुणे- पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वलवण गावाजवळ आज सोमवार (दि.२२) सकाळी पावणेसात वाजता झालेल्या मोटारीच्या भिषण अपघातात २ जण जागीच ठार झाले असून, १ जण गंभीर जखमी झाला आहे.
अपघातानंतर पुणे मुंबई महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली असून, आठवड्याचा पहिला दिवस असल्याने पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना सकाळी वाहतूक कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.