शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना ताजी असताना मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पूत्र आहेत. दरम्यान, हल्लेखोरानेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घोसाळकर, हे शिवसेना नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे ते चिरंजीव असून उपचारासाठी त्यांना करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर शिवसेनेच्या यूबीटी गटाच्या शिवसनिकांनी निषेधार्थ मॉरीसच्या कार्यालयाची पूर्णपणे तोडफोड करण्यात आली आहे.