नऊ वर्षाच्या लहान मुलीने नाणे गिळले; जिल्हा रुग्णालयात डॅाक्टरांच्या टीमने केले यशस्वी उपचार

गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (21:57 IST)
नऊ वर्षाच्या लहान मुलीने नाणे गिळल्यानंतर बुधवारी रात्री या मुलीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे जिल्हा रुग्णालयातील डॅाक्टरच्या टीमने दुर्बिणव्दारे पूर्ण भूल देऊन हे नाणे काढले. सारडा सर्कल येथे राहणा-या नऊ वर्षाच्या इकरा अन्वर चौधरी हिच्या घश्यात हे नाणे अडकल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी बुधवारी रात्री थेट जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या ठिकाणी कान नाक घसा तज्ज्ञ डॉ संजय गांगुर्डे, डॉ.गौरव बच्छव, डॉ प्रदीप वाघ ,भूल तज्ञ डॉ सचिन पवार त्यांचे सहकारी डॉ संदेश तसेच ऑपरेशन थिएटरचे नर्सिंग स्टाफ ज्योती वडणे, लता परदेशी व त्यांचे सहकारी यांच्या एकत्रित प्रयत्नाने दुर्बिणव्दारे हे नाणे काढले. या सर्व टीमचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात डॉ श्रीवास्, डॉ सैदाणे यांनी अभिनंदन केले. वर्षभरापूर्वी केरळमधील अलुवा शहराजवळ असलेल्या कदुंगल्लूर येथे नाणे गिळणाऱ्या एका तीन वर्षांच्या मुलाला योग्य वेळी उपचार न मिळू शकल्याने त्याचा मृत्यू झाला होता. पण, नाशिकमध्ये योग्यवेळी उपचार मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती