पोलिसांनी सांगितले की, ३० एप्रिलच्या रात्री वडिलांनी आपल्या मुलाची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, कामावरून घरी परतल्यानंतर वडील आणि मुलगा दोघेही दारूच्या नशेत होते.वडील आणि मुलामध्ये वडिलोपार्जित मालमत्तेच्या वाटणीचा मुद्दा उपस्थित झाला, ज्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला. मुलगा वडिलोपार्जित जमिनीतील वाटा देण्याबद्दल बोलू लागला, त्याच दरम्यान दारू पिऊन पित्याने मुलाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. काही वेळाने दोघांमध्ये हाणामारी झाली. वडिलांनी मुलगा रमेशवर काठीने हल्ला केला. काठीने केलेल्या हल्ल्यामुळे मुलगा खाली पडला, त्यानंतर वडिलांनी मुलाच्या डोक्यावर वरवंट्याने वार केले ज्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मृताची पत्नी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली. या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.