शिवसेनेचे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मतदारसंघातून उभे असून केवळ 48 मतांनी ते जिंकले.या वरून बराच वाद झाला.निवडणुकीच्या दिवशी गोरेगाव निवडणूक केंद्रावर मोबाईल बंदी असताना मोबाईलचा वापर केल्या प्रकरणी रवींद्र वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर यांच्यासह निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निवडणूक आयोगाचे अधिकारी गौरव यांच्याकडे एक मोबाईल फोन होता ज्याद्वारे मतमोजणी दरम्यान एक ओटीपी तयार होतो आणि हा मोबाईल वाईकरांचे नातेवाईक पंडिलकर वापरत होते. पहाटेपासून दुपारी 4 वाजे पर्यंत मोबाईलचा वापर केल्याचा पोलिसांना संशय आहे.
या घटनेबाबत काँग्रेसने सोशल मीडियावर पोस्टही केली आहे. काँग्रेसने ट्विटरवर लिहिले की, 'ईव्हीएमशी संबंधित एक गंभीर बाब समोर आली आहे. मुंबईत एनडीएचे उमेदवार रवींद्र वायकर यांच्या नातेवाईकाचा मोबाईल फोन ईव्हीएमशी जोडण्यात आला होता. अशा स्थितीत एनडीएच्या उमेदवाराच्या नातेवाईकाचा मोबाईल ईव्हीएमशी का जोडला गेला? मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल फोन कसा पोहोचला? शंका निर्माण करणारे अनेक प्रश्न आहेत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे.