कुटुंबीय अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेल्याचा गैरफायदा घेत साडे सात लाखांची घरफोडी

शुक्रवार, 1 जुलै 2022 (07:36 IST)
नाशिक जिल्ह्याच्या मालेगाव शहरातील मोहम्मद शफि शेख बिस्मीला यांचे कुटुंब अंत्यविधीसाठी बाहेर गेले होते. याचा फायदा चोरांनी घेतला असून त्यांच्या घरात सोनं आणि काही रोकड असा सात लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याला धाडसी घरफोडीच म्हणावी लागेल…याबाबत मालेगाव च्या आयशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
 
अधिक माहिती अशी की, सेवानिवृत्त कर्मचारी मोहम्मद शफि शेख बिस्मीला (वय ५८, रा. अन्सार कॉलनी) हे कुटुंबियांसह रविवारी (२६ जूनला) एका नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी बाहेरगावी गेले होते.या संधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात ्री त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी कपाटाचे कुलूप तोडून आतील ५० हजार रुपयांची रोकडसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण तब्बल ७ लाख ३५ हजार ३९ रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
 
कुटुंबीय अंत्यविधीहून परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा आढळून आल्याने घडलेला प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी तत्काळ आयशानगर पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. तत्काळ पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती