अबब ! 45 लाख रुपयांची उशी, वैशिष्ट्ये जाणून घ्या

रविवार, 26 जून 2022 (13:26 IST)
झोपताना आपण सर्वजण डोक्याखाली उशी ठेवतो. बाजारात उशी खरेदी करण्यासाठी 250-300 रुपयांपेक्षा जास्त उशीची किंमत नाही. मायक्रोफायबर उशांबद्दल बोलायचे तर त्यांची किंमत हजारापेक्षा जास्त नाही. पण, लाखो रुपयांची उशी आहे असे जर तुम्हाला कोणी सांगितले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही नक्कीच असा विचार कराल की या लाख रुपयांच्या  उशीचे वैशिष्ट्ये तरी काय आहेत? तर याची किंमत आहे 45 लाख रुपये आणि ही उशी युरोप मध्ये लोकप्रिय होत आहे. 
 
ही खास उशी शॉपिंग वेबसाइट्सवर 45 लाख रुपयांना विकला जात असून त्याला 'अल्फोर्जा कॅट' असे म्हणतात. या उशीमध्ये सोने, चांदी, नीलम आणि हिरे अशी अनेक मौल्यवान रत्ने जडलेली आहेत. या उशीची झिप चार हिऱ्यांनी जडलेली आहे. त्यांच्या आत असलेला कापूस रोबोटिक मिलिंग मशीनने भरला जातो. उत्पादनानंतर, ही उशी विशेष बॉक्समध्ये पॅक केल्या जातात आणि विकल्या जातात.
 
तणाव, डोकेदुखी घोरण्या सारखे त्रास दूर होतील-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जगातील सर्वात महाग उशीची रचना नेदरलँडच्या फिजिओथेरपिस्टने केली आहे. ते बनवण्यात त्यांनी आपल्या आयुष्यातील 15 वर्षे घालवली आहेत. ते म्हणतात की ज्यांना निद्रानाश, डोकेदुखी, मानसिक तणाव किंवा घोरणे इत्यादी तक्रारी आहेत त्यांच्यासाठी ही उशी खूप फायदेशीर आहे. फिजिओथेरपिस्टच्या मते, या उशीवर डोके ठेवल्याने लगेचच झोप लागते आणि सर्व प्रकारच्या मानसिक तणावातून मुक्ती मिळते.
 
या उशीची किंमत 57 हजार डॉलर्स किंवा 45 लाख रुपये आहे. याबाबत युरोपीय देशांमध्ये अनेक चर्चा सुरू आहेत. विशेष म्हणजे मानसिक ताणतणाव दूर करण्याच्या दाव्यामुळे अनेक लोक त्याची खरेदीही करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती