हॉलतिकीटसाठी 30 हजार रुपये!

मंगळवार, 15 मार्च 2022 (10:07 IST)
औरंगाबाद : राज्यात आजपासून आजपासून दहावीची परीक्षा (SSC Board) सुरु होत आहे. ही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्याला परीक्षेचं हॉलतिकीट देण्यासाठी संस्थेच्या संचालकाने 30 हजार रुपयांची लाच मागितल्याचे कळते. याप्रकरणी संचालकासह एका महिला लिपिकाला अटक करण्यात आली आहे.
 
कलावतीदेवी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष एस. पी. जवळकर यांनी एका बहिःस्थ विद्यार्थ्यांकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. हॉलतिकीट देण्यासाठी आणि परीक्षेत मदत करण्यासाठी बहिःस्थ परीक्षार्थ्याकडे त्यांनी 30 हजार रुपये मागितल्यानंतर 10 हजार रुपये स्वीकारताना त्यांना पोलिसांनी अटक केली. शाळेतील लिपिक सविता खामगावकर यादेखील लाचखोरीत सहभागी असल्यानं त्यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती