वाशिममध्ये विहिरीत 350 वर्ष जुने शिवलिंग आढळले

सोमवार, 6 जून 2022 (18:00 IST)
देशात ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार वाद सुरु आहे. आता वाशिमच्या कारंजात विहिरींची सफाई करत असताना जुने शिवलिंग आढळले.हे शिवलिंग 350 -ते 400 वर्ष जुने असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेमुळे कारंजा शहरात सर्वत्र चर्चा होतं आहे. 
 
सध्या उन्हाळा जास्त वाढला आहे त्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे. वाशिमच्या कारंजा लाड शहरात नागरिकांना पाण्याच्या त्रास होतं असल्यामुळे नागरिकांच्या पाण्याच्या सोयी साठी जुन्या विहिरीला स्वच्छ करण्याचं काम टिळक मित्र मंडळाने हाती घेतले आणि या जुन्या विहिरीतून पाणी मिळावं या साठी  कारंजाच्या लोकमान्य टिळक चौकातील 30 फूट विहीर स्वच्छ करण्यास सुरु केले त्यातील गाळ काढताना एक पुरातन शिवलिंग आढळले. शिवलिंग पाहून लोकांना आश्चर्याचा धक्काच बसला. विहिरीत शिवलिंग आढळल्याची बातमी कळतातच गावातील नागरिकांनी शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. 
 
विहिरीत हे शिवलिंग कुठून आले हा प्रश्न लोकांसमोर उद्भवत आहे. हे शिवलिंग नर्मदा नदीत सापडणाऱ्या शिवलिंगा प्रमाणे असून या शिवलिंगाला विहिरी जवळ असलेल्या एका झाडाखाली ठेऊन विधीवत पूजन करून भाविकांना दर्शन घेण्यासाठी ठेवले आहे. या शिवलिंगाचे नाव नर्मदेश्वर शिवलिंग ठेवण्यात आले आहे.   
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती