पीडितेचा गर्भपात करत अर्भक पुरले जमिनीत
वाशिम : जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. एका डॉक्टराने आपल्याच रुग्णालयातील एका महिला नर्सवर वारंवार लैंगिक अत्याचार केले आहेत. याप्रकरणी पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली असून गुन्हा दाखल केला आहे. डॉ. गोपाल इंगोले असे आरोपीचे नाव आहे. डॉक्टरने केलेल्या लैंगिक अत्याचाराने जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर विविध चर्चेला उधाण आले असून रुग्णांचा डॉक्टरांवरील विश्वास उठतो की काय, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.