पंढरपूरमध्ये कोणतीही वैद्यकीय पदवी न घेता दहावी उत्तीर्णने उघडले बनावट क्लिनिक

बुधवार, 22 जानेवारी 2025 (15:26 IST)
पंढरपुरात कोणतीही वैद्यकीय पदवी न घेता 10वी उत्तीर्ण एका  व्यक्तिने बनावट क्लिनिक उघडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे. सलग तीन वर्षांपासून हे क्लिनिक उघडले असून आरोपी डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर मधुमेह, हाडांचे विकार, या सह इतर गंभीर आजारांवर आरोपी रुणांचा उपचार करायचा.आरोपी कड़े कोणतीही वैद्यकीय पदवी नाही.   

दत्तात्रेय सदाशिव पवार असे आरोपीचे नाव असून कोणत्याही औपचारिक वैद्यकीय प्रशिक्षणा शिवाय किवा वैध परवान्याशिवाय रुग्णांवर उपचार करायचा. त्याने साताऱ्यात केवळ चार दिवस प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणाच्या आधारे, त्यांनी स्वतःचे क्लिनिक उघडले आणि तीन वर्षे कोणत्याही औपचारिक वैद्यकीय प्रशिक्षणाशिवाय किंवा वैध परवान्याशिवाय रूग्णांवर उपचार केले.आरोपी रुग्णांकडून सल्लासम्मत करण्यासाठी 500 रूपये घ्यायचा. आणि दररोज 70 ते 80  रुग्णांची तपासणी करायचा. आरोपीने शेगाव मध्ये देखील बनावट क्लिनिक उघडले. इथेही आरोपी डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करायचा. लोक त्याच्यावर विश्वास ठेवू  लागले. 
ALSO READ: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, महिलेचा मृत्यू तर पाच जण जखमी
वृतानुसार, आरोपी पवार यांच्या वागणुकीवर संबंधित रहिवाशांना संशय आला. आरोग्य विभाग सतर्क झाला आणि क्लिनिकवर स्थानिक पोलिसांच्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकला. छाप्यादरम्यांन पवार यांच्याकडे वैद्यकीय परवाना किवा पात्रता नसल्याचे उघडकीस आले. या आरोपाखाली पवार यांना फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांचे क्लिनिक देखील बंद करण्यात आले आहे. 
Edited By - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती