सध्या महाराष्ट्रात हिंदी आणि मराठी भाषा शिकवण्यावरून वाद सुरु आहे.अलीकडील काळात मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पालक मुलांना इंग्रजी शाळेत शिकायला पाठवतात. या मुळे मराठी शाळांमध्ये दिवसेंदिवस पटसंख्या कमी होत आहे. राज्यभरात गेल्या काही वर्षांमध्ये हजारोंच्या संख्येने मराठी शाळा बंद पडल्याचे समोर आले आहे.
राज्यातील 7,420 सरकारी मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या 10 पेक्षा कमी झाली आहे. शिक्षण विभागाच्या जून 2025 च्या अहवालात हे उघड झाले आहे. 20पेक्षा कमी विद्यार्थ्यांमुळे या शाळा बंद होण्याची शक्यता असल्याने शिक्षक चिंतेत आहेत.