आरोपीने 7 एप्रिल रोजी घराच्या समोर असलेल्या तीन शाळकरी मुलींना जवळ बोलावून पैशाचे आमिष दाखवून मुलींना घरी येण्यास सांगत त्यांच्यासमोर अश्लील वर्तन केले.मुली या प्रकाराने घाबरल्या आणि त्यांनी घडलेले शाळेच्या मुख्याध्यापिकांना सांगिलते.
मुख्याध्यापिकेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे नाव यल्लाप्पा कुंचिकोर्वे आहे. पोलिसांनी आरोपी वृद्धाच्या विरोधात जेलरोड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.