मिळालेल्या माहितीनुसार लिपाराम्बा फास्ट-ट्रॅक विशेष न्यायालयाने मंगळवारी ही शिक्षा सुनावली. कोविड-१९ महामारीच्या लॉकडाऊन दरम्यान आरोपी शिक्षकाने १६ वर्षीय विद्यार्थिनीचे दोन वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण केले. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश यांनी आरोपीला पॉक्सो कायदा आणि आयपीसीच्या कलमांखाली अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवले. न्यायालयाने दोषीला ९.१० लाख रुपयांचा दंडही ठोठावला.