शेतकऱ्यांच्या खात्यांवर 637 कोटी जमा!

रविवार, 11 फेब्रुवारी 2024 (15:59 IST)
जिल्ह्यात 2022 ते 2023 कालावधीत झालेल्या अतिवृष्टी, गारपीट अवकाळी येणार सततचा पाऊस, मुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे 637 कोटी 78 लाखांची मदतरुपी अनुदान मंजूर करण्यात आले असून सदर रकम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची माहिती महसूल व पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलांनी दिली.
 
जिल्ह्यात 2022 सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीत सुमारे 2 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. महसूल आणि कृषी विभागाने केलेल्या संयुक्त पंचना केल्यावर 291 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. 
 
शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून 2 लाख 92 हजर 750 शेतकऱ्यांना 241 कोटी रुपयांची मदत शासनाकडून देण्याची माहिती पालक मंत्री विखे पाटीलांनी दिली.   

आता पर्यंत झालेल्या नैसर्गिक नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार उभे आहे जिल्ह्याला आतापर्यंत 637 कोटींची मदत शेतकऱ्यांना दिली आहे. या बाबतची संपूर्ण माहिती पोर्टल वर दिली असून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती विखे पाटीलांनी दिली. 
 
Edited By- Priya Dixit  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती