नेमकं काय घडलं?
विजय फुगा फुगवत होता. फुगा फुगवत असताना फुगा अचानक घशात अडकला. फुगा गळ्यात अडकल्याने विजयला श्वास घ्यायला त्रास होवू लागला. तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रुग्णालयात दाखल करताचं विजयला मृत घोषित करण्यात आलं. घडल्या प्रकरणाची नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.