केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचे पोस्टर फाडल्याच्या आरोपातून शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यासह 6 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आल़ी. शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ आमदार साळवी व त्यांच्या समर्थकांनी शहरातील मारूती मंदीर परिसरातील नारायण राणे यांचे पोस्टर फाडल्याचा आरोप साळवी व त्यांच्या समर्थकांवर ठेवण्यात आला होत़ा.
शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आल़ी. आमदार राजन प्रभाकर साळवी (54, ऱा खालची आळी, रत्नागिरी), संजय पभाकर साळवी (50, ऱा तेलीआळी, रत्नागिरी), परेश गजानन खातू (43, ऱा संगमेश्वर), पसाद सुरेश सावंत (40, ऱा शिवाजीनगर रत्नागिरी), पकाश धोंडू रसाळ (66, ऱा नाचणे रत्नागिरी), पकाश शंकरराव साळुंखे (45, ऱा साळवी स्टॉप रत्नागिरी) अशी निर्दोष मुक्तता करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़ पथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या खटल्याचा निकाल दिल़ा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होत़ा याच्या निषेधार्थ शिवसैनिकांकडून राज्यभर आंदोलने करण्यात येत होत़ी दरम्यान नारायण राणे हे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त 24 ऑगस्ट 2021 रोजी रत्नागिरीत येणार होत़े यासाठी भाजपकडून शहराच्या विविध भागात राणे यांच्या स्वागतासाठी झेंडे व पोस्टर लावण्यात आले होत़े.
24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आमदार राजन साळवी हे आपल्या समर्थकांसह राणे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी मारूती मंदीर परिसरात पोहोचल़े यावेळी आमदार साळवी यांनी राणे यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवित जोरदार घोषणाबाजी केल़ी तसेच मारूती मंदीर सर्पल येथील राणे यांच्या स्वागताचे पोस्टर देखील फाडून टाकल़े असा आरोप आमदार राजन साळवी व त्यांच्या समर्थकांवर ठेवण्यात आला होत़ा.
या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा पश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी हस्तक्षेप केल़ा तसेच विनापरवाना एकत्र जमणे, पोस्टर फाडणे, सार्वजनिक शांतता बिघडविणे आदी कारणांमुळे पोलिसांकडून आमदार राजन साळवी व अन्य 6 जणांवर भादवि कमल 143, 269, 427 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) 135 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला होत़ा न्यायालयाने यापकरणी आमदार साळवी व अन्य सहा जणांची निर्दोष मुक्तता केल़ी.