महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेतील 539 पोलीस उपनिरीक्षकांना सहाय्यक निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) कुलवंत कुमार सारंगल यांनी बुधवारी दिला आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील 12 अधिकारी आहेत. तर राज्यातून पिंपरी चिंचवड शहरात 14 अधिकारी बढतीवर बदलून आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील बढती मिळालेले अधिकारी (बढतीवर बदलीचे ठिकाण) –
प्रसाद सुरेश दळवी (पिंपरी-चिंचवड)
उत्कर्षा प्रमोद देशमुख (कोकण परिक्षेत्र)
प्रशांत हनुमंत साबळे (नागपूर शहर)
शरद निवृत्ती अहेर (अमरावती परिक्षेत्र)
महेंद्र कारभारी आहेर (नागपूर शहर)
विठ्ठल बाबासाहेब बढे (ठाणे शहर)
प्रमोद रमकृष्ण कटोरे (नाशिक परिक्षेत्र)