नाशिक :- महिलेचा विनयभंग करून तिच्याबरोबरचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच महिलेकडून 40 लाख रुपयांची रक्कम उकळणार्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी अभिजित नरेंद्र आहिरे व फिर्यादी महिला हे एकमेकांशी परिचित आहेत. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपी आहिरे याने पीडित महिलेचा पाठलाग करून जून 2007 ते 2008 या कालावधीत स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला, तसेच शिवीगाळ व दमदाटी करून तिच्यासोबतचे काही अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून 40 लाख रुपयांची ऑनलाईन व रोख स्वरूपात उकळली.
ही बाब लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, आरोपी अभिजित आहिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.