शेकोटीमुळे आग लागून 2 भावांचा दुदैवी मृत्यू

शुक्रवार, 19 जानेवारी 2024 (13:15 IST)
सध्या सर्वत्र थंडी पसरली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी पेटवलेल्या शेकोटीमुळे घरात लागलेल्या आगीत होरपळून 2 भावांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास नागपुरातील सेमिनारी हिल्स हजारीपाडा भागात घडली. आईवडील घरात नसताना तीन मुलांनी पेटवलेल्या शेकोटीमुळे घराला आग लागली 

मिळालेल्या माहितीनुसार, रणजित उईके हे खासगी कंपनीत कामाला आहे. त्यांची पत्नी दीपाली या वस्तीतील एका महिला नातेवाईकांकडे गेलेल्या असताना घरात त्यांचे 2 मुले प्रभास(3) आणि देवांश(7) हे होते. त्यांचा सोबत शेजारी राहणारी 10 वर्षाची मुलगी खेळायला आली. त्यांना थंडी वाजू लागल्यामुळे त्यांनी घरात ठेवलेली शेकोटी पेटवली. शेकोटीने पेट घेतला आणि घराला आग लागली. मुलीने तिथून पळ काढत आपला जीव वाचवला मात्र दुर्देवाने प्रभासला घेऊन देवंशाला बाहेर पडता आले नाही आणि त्यांच्या आगीत होरपळून मृत्यू झाला. 
 
Edited By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती