‘जीवनदूत’ उपक्रमांतर्गत पोलिसांना गस्त घालण्यासाठी 100 स्मार्ट सायकल

शनिवार, 29 मे 2021 (07:39 IST)
पिंपरी चिंचवडमध्ये ‘जीवनदूत’ उपक्रमांतर्गत पोलिसांना गस्त घालण्यासाठी 100 स्मार्ट गिअर सायकल आणि हेल्मेट वाटप करण्यात आले. युनायटेड वे मुंबई आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या वतीने हे वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत  हा कार्यक्रम पार पडला.
 
‘ग्राम सुरक्षा दल, पोलीस मित्र तसेच मोहल्ला कमिटीचे सभासदांना विश्वासात घेऊन त्यांचे सर्व गल्ली बोळात जाऊन स्मार्ट पेट्रोलिंग केल्यास भयमुक्त वातावरण तयार होण्यास मदत होईल. तसेच, नागरिकांचा पोलिसांमध्ये सहभाग वाढल्यास पोलिसांची शक्ती नक्कीच वाढणार आहे. रस्ते अपघातात फर्स्ट रिस्पोंडर म्हणून पोलीस आपली भूमिका बजावत असतात. जीवनदुत या उपक्रमांतर्गत पोलिसांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण मिळाल्यास रस्ते अपघातग्रस्तांना तात्काळ प्राथमिक उपचार उपलब्ध होण्यास मदत होईल,’ असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.
 
‘रस्ते अपघातात फर्स्ट रिस्पॉडर म्हणून पोलीस आपली भूमिका बजावत आहेत. ‘जीवनदुत’ या उपक्रमांतर्गत पोलीस अधिकारी / अंमलदार यांना रस्ते अपघातग्रस्तांना तात्काळ प्राथमिक उपचार मिळावेत याकरिता प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नऊ प्रशिक्षण चौक्या उभारण्यात येणार आहेत. 180 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना चार तासांचे प्राथमिक प्रशिक्षण देण्यात येणार असुन प्रशिक्षण पूर्ण केल्यास त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे,’ असे अजय गोवले म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती