१५ बंडखोर आमदार महायुतीसोबत – मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्पष्ट कौल दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे, याबाबत आता कोणतीही शंका राहिलेली नाही. गेल्या पाच वर्षांत आम्ही जे काम केले त्यापेक्षा अधिक चांगेल काम करण्याचा आमचा आता प्रयत्न राहणार आहे. एक भक्कम सरकार आम्ही देणार आहोत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
 
निवडून आलेल्या बंडखोरांपैकी १५ आमदार महायुतीसोबत येणार असल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. राज्यातील निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजप कार्यालयात येऊन कार्यकर्ते व नेत्यांसोबत आनंद साजरा केला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निकालावर भाष्य केले. भाजपला अपेक्षित यश मिळालं नसल्याने मुख्यमंत्री काहीसे अस्वस्थ झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होते. उद्धव ठाकरे यांनी फॉर्मुल्याची आठवण करून देत सत्तेत समान वाटा मिळायला हवा ही मागणी रेटली आहे. त्याकडे लक्ष वेधले असता ‘आमचं जे ठरले आहे त्यानुसारच आम्ही पुढे जाणार आहोत’, असे फडणवीस म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती