राज्य सरकारने यासंबंधी घोषणा केली होती. एक्स्प्रेस-वेवर लेनची शिस्त मोडणाऱ्यांसह अतिवेगाने वाहने चालवणाऱ्यांवर, चुकीच्या पद्धतीन ओव्हरटेक करणाऱ्यांवर आता चोवीस तास ड्रोनची नजर राहणार आहे. रस्ते विकास महामंडळ, ‘आयआरबी’च्या वतीने एक्स्प्रेस-वेवर चार ठिकाणी ड्रोन तैनात करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान लेनची शिस्त मोडणाऱ्या अवजड वाहनांविरोधात कारवाईही करण्यात आली.