लवकरच ‘टोलमुक्ती’?

शुक्रवार, 27 मार्च 2015 (11:48 IST)
टोलच्या विषयावर याच अधिवेशनात तोडगा काढला जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केल्याने राज्यातील नागरिकांची लवकरच टोलमुक्ती होण्याची शक्यता आहे. मात्र, सरसकट सर्व टोल बंद होणार की कसे, ते लवकरच कळणार आहे.
 
राज्यातील सध्याच्या रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी व नवीन रस्ते तयार करण्यासाठी दीड लाख कोटींची गरज आहे. बांधकाम विभागाचे बजेट गेल्यावर्षी २७०० कोटी होते ते यावर्षी ३७०० कोटी करण्यात आले आहे. मात्र हे देखील अपुरे आहे त्यामुळे नवीन रस्ते करण्यापेक्षा आहे ते रस्ते नीट करण्यावर भर दिला जाईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा