राकॉपा मंत्र्यांचा सामुहिक राजीनामा

वेबदुनिया

मंगळवार, 25 सप्टेंबर 2012 (19:38 IST)
FILE
उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी सिंचन घोटाळ्यात आरोपाप्रकरणी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत.

राज्यात कॉंग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकारचे समर्थन मागे घेण्याच्या मागणीसाठी त्यांनी सामुहिक राजीनामा दिल्याचे समजते.

या घटनाक्रमामुळे राज्यातील राजकारणात भूकंप आला असून राकॉपा मंत्र्यांवर एकापाठोपाठ भ्रष्ट्राचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसवर दबाव निर्माण करण्यात येत आहे.

दरम्यान राकॉपा नेते प्रफ्फुल पटेल यांनी राज्यातील कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. अजीत पवारांऐवजी सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले. हे राजीनामा नाट्य नसून पूर्ण विचाराअंती राजीनामा ‍देण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले.

वेबदुनिया वर वाचा