दहावी व बारावी परीक्षेचा ऑक्टोंबर परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. दहावीचा निकाल २९.५ तर बारावीचा निकाल २६.७७ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे गतवर्षीपेक्षा यंदाचा निकाल अनुक्रमे ११ व ५ टक्यांनी वाढला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी १ लाख ३७ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.